कुणीच नाही माझे ..आई करूणेचे तळहात पोरके ..आई
आकांत श्वासांत , शांतता कुजबुज टाळे माझे ..आई ना शुन्य आसपास, काळोख मावळे माझे ..आई असे जवळ - तसे दूर भाबडे अंतराळ माझे ..आई
कुणीच नाही माझे ..आई करूणेचे तळहात पोरके ..आई
असेल - आहे - असणार, कुणी शब्द गाळले माझे ..आई अपराध असा परमेशाचा, का? तेज लोपती माझे ..आई अभेद्य चौकट अश्रुंची, चित्र पुराणे माझे ..आई
कुणीच नाही माझे ..आई करूणेचे तळहात पोरके ..आई