प्रमोद गुरुनाथ पवार

प्रवक्ता , श्रमजीवी संघटना

अत्यंत सामान्य कुटूंबात जन्म, वडील माथाडी कामगार, 2006 पासून 2013 पर्यंत शोध पत्रकारितेत काम, मानवी हक्क वार्ता पुरस्कार प्राप्त पत्रकार,आदिवासी, वंचित, स्थलांतरित कामगारांच्या प्रश्नावर उल्लेखनीय लिखाण. खावटी कर्जाच्या अपहाराबाबतच्या शोध वृत्ताला पुरस्कार.श्रमजीवी संघटनेत सक्रिय काम, श्रमजीवी युवक आघाडीच्या माध्यमातून युवकांचे संघटन, संघटनेचे राज्य प्रवक्ते म्हणून 2016 पासून कार्यरत.कुपोषणाच्या प्रश्नावर उल्लेखनीय कार्य, कुपोषित बालकांच्या आहाराची थकीत रक्कम महिलांना मिळावी म्हणून लक्षवेधी आंदोलनात तुरुंगवास स्विकारला होता.यासंह अनेक प्रश्नांवर सक्रिय लक्षवेधी आंदोलन केल्याचा आणि त्यात यश मिळविल्याचा इतिहास.