नितीन थोरात

नितीन थोरात हे पुणे जिल्ह्यातल्या पिंपळगावचे. गावाकडं दहावीपर्यंतचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर त्यांनी पुण्यातल्या एसपी कॉलेजमधून बीए अर्थशास्त्र ही पदवी घेतली. लेखनाची आवड असल्यानं त्यांनी रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेचा डिप्लोमा आणि मास कम्युनिकेशनची डिग्री घेतली. त्यानंतर त्यांनी पुढारी, लोकमत आणि सकाळ या वृत्तपत्रांमध्ये उपसंपादक म्हणून काम पाहिलं. दरम्यान 2015 मध्ये त्यांनी सूर्याची सावली ही कादंबरी लिहिली. या त्यांच्या पहिल्याच कादंबरीला राज्यशासनाचा श्री. ना. पेंडसे पुरस्कार मिळाला.

नितीन थोरात यांची पुस्तके

  1. सूर्याची सावली
  2. खंडोबा
  3. अंबालक्ष्मी
  4. सोंग
  5. पेटलेलं मोरपीस
  6. कोप
  7. खजाना

नितीन थोरात यांचे ऑडिओ बुक

  1. सोंग
  2. पुढचं सोंग
  3. पेटलेलं मोरपीस
  4. पेटलेलं मोरपीस भाग दोन
  5. पेटलेलं मोरपीस भाग तीन
  6. मरडेल
  7. गण्या लव्ह कॅरोलिना
  8. लव्ह at बुधवार पेठ

नितीन थोरात यांचे कथासंग्रह

  1. खुशबू
  2. कल्पी

References

edit